सहकारी
PRACHI Collaborators and partnerships
प्राची होप फाऊंडेशन: गेल्या काही महिन्यांपासून भारतातील विविध प्रदेशांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी काम करत असलेल्या अनेक प्रतिष्ठित भागीदार संस्थांसोबत आम्ही सक्रिय सहकार्य करत आहोत. या भागीदारीतील सर्वांचे उद्दिष्ट कर्करोगाविषयी जागृती, शिक्षण व सहाय्य यांचा आवाका वाढवणे आहे जेणेकरून देशभरात उपलब्ध असलेल्या कर्करोग प्रतिबंध, शोध आणि उपचार पर्यायांबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळेल याची खात्री करता येईल.
आम्ही इतरही आघाडीच्या कर्करोग-रुग्ण सहाय्यक संस्थांशी चर्चा करत आहोत आणि लवकरच आमच्या सहकारी संस्थांमध्ये त्यांचाही समावेश करण्याची आम्हाला आशा आहे. याशिवाय सहकार्यासाठी इतर असेच कार्य करणाऱ्या इतर संस्थांबरोबर काम करण्यासाठी PRACHI प्रयत्नशील आहे.
खाली दिलेल्या संस्थांच्या प्राची-बाह्य वेबसाइटना भेट देताना कृपया लक्षात ठेवा की PRACHI या इंटरनेट संसाधनांवरील अचूकता आणि त्यांची आवृत्ती अद्ययावत असण्याबद्दल जबाबदार असू शकत नाही. तसेच आम्ही या दुव्यांच्या गोपनीयता पद्धतींसाठी जबाबदार नाही. वापरकर्त्यांनी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्यांच्या धोरणांचे परीक्षण करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो.
JASCAP, MUMBAI
JASCAP / जसकॅप (जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंट्स) कर्करोगाच्या रुग्णांना आणि त्यांच्या काळजीवाहकांना विविध कर्करोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल तयार, समर्पक आणि संबंधित माहिती उपलब्ध करून देऊन माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. PRACHI ठाणे, पुणे आणि फोंडा (गोवा) येथे या संसाधनांचे एक नि:शुल्क वाचनालय चालवते.
आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप
आस्था ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट जागरूकता, तपासणीपासून ते स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या पुनर्वसनापर्यंतच्या सर्व पैलूंचा समावेश करणे हे आहे. अलिकडील वर्षांत या उद्दिष्टांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगासारखे इतर महिलांचे कर्करोग आणि अशक्तपणा आणि मधुमेह यासारख्या काही महिलांच्या आरोग्य समस्यांचा समावेश करण्यात आहे. प्राची आस्थासोबत स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी तपासणी शिबिरे आयोजित करत आहे.

अस्मिता मेडिकल फाउंडेशन, पुणे
अस्मिता मेडिकल फाउंडेशन ही पुण्यातील गुप्ते हॉस्पिटलची सामाजिक शाखा आहे जी मुलींना त्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करते. जागृती प्रकल्पांतर्गत, एचपीव्ही ह्या विषाणूच्या संसर्गाची लवकर निदान करण्यास देखील मदत करते (ज्यामुळे सुमारे ९०% गर्भाशयाचे कर्करोग टाळता येवू शकतात), तसेच एचपीव्ही आणि त्याविषयीचे समुपदेशन, जागरूकता यासंबंधी कार्य करते. प्राची अस्मिता फाउंडेशनच्या सहकार्याने गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प आयोजित करत आहे.

रोटरी क्लब
रोटरी क्लब इंटरनॅशनलने रोटरी क्लब ऑफ हिरोशिमाच्या ग्लोबल ग्रँटद्वारे स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यास सक्षम केले आहे. रोटरी क्लब ऑफ गांधी भवन, पुणे नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ सिनर्जी पासपोर्ट, कागल एमआयडीसी, कोल्हापूर, आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, या रोटरी क्लबच्या विविध शाखांसोबत सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यास प्राचीने प्रारंभ केला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (DMH) प्रतिबंधात्मक चिकित्सालय/वैद्यकीय विभाग
DMH प्रतिबंधात्मक वैद्यकीय केंद्र अत्याधुनिक निदान, उपचारात्मक आणि अतिदक्षता सेवा सुविधा देते. PRACHI DMH च्या प्रतिबंधात्मक वैद्यकीय विभागासोबत काम करते. भविष्यात कर्करोग रुग्णांच्या सेवेसाठी DMH कर्करोग-विभागाबरोबर त्यांचे सहकार्य या कार्याची व्याप्ती आणखी वाढवेल.


