मराठीमध्ये वाचण्यासाठी इथे भाषा बदला:

नोंदणी करा

मदत मिळवा

जर तुम्ही रुग्ण असाल किंवा मदतीची अपेक्षा करणारे नातेवाईक असाल तर आजच नोंदणी करा. जरी प्राची होप फाऊंडेशन वैद्यकीय निदान सल्ला, उपचार किंवा आर्थिक मदत देत नसले तरी, ते तुमच्या कर्करोगाबद्दल, कर्करोग तज्ञांबद्दल, रुग्णालये आणि तुमच्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यास मदत करणाऱ्या संस्थांबद्दल माहिती देईल आणि तुमच्या आजाराचे व्यवस्थापन करण्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल.

आमच्यात सामील व्हा

रुग्णांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आमच्यात सामील व्हा. रोग किंवा त्याचे उपचार समजून घेणे ही एक गोष्ट आहे, रुग्णाला समजून घेणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे! कर्करोग शास्त्रज्ञांना कर्करोग समजतो, कर्करोग तज्ञांना कर्करोग उपचार समजतात, तर काळजीवाहक रुग्णांना समजून घेतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी प्राची स्वयंसेवक तिन्हीं प्रकारे मदत करण्यासाठी प्रयत्न करतात, आणि रोग आणि उपचार पर्याय समजून घेण्यास मदत करतात. स्वयंसेवकांना मोकळ्या वेळेत मदत केल्याचे समाधान मिळेल, प्रशिक्षणार्थींना मौल्यवान अनुभव मिळेल.

देणगी द्या

तुमच्या देणगी द्वारे आणि ओळखीने कर्करोगी रूग्णांना मदत मिळावी म्हणून आणखी बरेच काही करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.कर्करोग रुग्णांना आणि त्यांच्या काळजीवाहकांना प्राची कडून सर्व ऑनलाइन आणि वैयक्तिक सेवा मोफत दिल्या जातील. या सेवा आणि कर्करोग जागरूकता मोहिमांसाठी निधी पूर्णपणे देणग्यांमधून उभारला जाईल. या परोपकारी प्रयत्नात उदार योगदान देण्याचे आम्ही तुम्हाला मनापासून आवाहन करतो. तुमच्या देणगीला आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत करातून सूट आहे.


कर्करोगाचे निदान झाले असले तरी जीवन आशादायक असू शकते.

रुग्ण कर्करोग निवडत नाहीत, परंतु ते आनंदी आणि शांत राहण्याचा पर्याय निवडू शकतात! आणि आम्ही मदत करण्यासाठी येथे आहोत. आमचा ठाम विश्वास आहे की कर्करोगाचे निदान झाले तरी आशा आणि आनंद असू शकतो! पराभव स्वीकारू नका, मृत्यू स्वीकारू नका. त्याऐवजी, कर्करोग स्वीकारा, जीवन स्वीकारा!

आम्ही तुमच्या कर्करोगाबद्दल, वैद्यकीय अहवालांबद्दल आणि रुग्णालये, कर्करोग तज्ञ आणि उपचारांच्या उपलब्ध पर्यायांबद्दल माहिती देण्यासाठी येथे आहोत. आम्ही तुम्हाला पुढे काय आहे याची देखील ओळख करून देऊ. पूर्वतयारी असली तर अवघड परिस्थितीला तोंड देता येते; आम्ही तुम्हाला संभाव्य मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आव्हानांसाठी तयार करू.

सहाय्य

प्राची रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्करोगाचे निदान, उपचार, आरोग्यसेवेतील पर्याय, दुसरे वैद्यकीय मत, प्रवास वा वाहतूकीसाठी मदत, आणि आवश्यक असल्यास, चांगल्या प्रतीचे आयुष्य जगण्यासाठी उपशामक आणि जीवनाच्या अखेरीच्या काळजीसाठी वैद्यकीय पर्याय समजून घेण्यास मदत करू शकते.

जागरूकता

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारादरम्यान आणि नंतर कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी करण्यासाठी निरोगी सवयी लावण्याबाबत मार्गदर्शन.

निरामय आयुष्यासाठी मदत

रुग्णांना आणि त्यांच्या प्रियजनांना काळजीपूर्वक आणि सहानुभूतीने मदत करण्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून प्राची त्यांना जवळजवळ सामान्य जीवन जगण्यास मदत करू शकते.

बातम्या आणि कार्यक्रम

PRACHI Cancer Patient Support Community

एकतेत सामर्थ्य आहे! एकत्रितपणे, आपण कर्करोगाच्या पार्श्वभूमीवरील जीवन सक्षम बनवू शकतो.

योग्य त्या समूहामध्ये सहभागी व्हा.