सल्लागार
वैद्यकीय सल्लागार मंडळ

डॉ. अनिल डी'क्रूझ
कर्करोग शल्य चिकित्सा तज्ज्ञ
डॉ. डी'क्रूझ हे देशातील तोंडाच्या आणि जिभेच्या कर्करोगांचे एक अव्वल शल्यविशारद असून, सध्या अपोलो रुग्णालयांच्या कर्करोग केंद्रांचे शल्य विभागाचे संचालक आहेत. कर्करोग शस्त्रक्रियेमध्ये ३७ वर्षांहून अधिक अनुभव असलेले हेड अँड नेक ऑन्कोलॉजी या क्षेत्रातील जागतिक नेते, शल्यचिकित्सक, संशोधक आणि शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. डी'क्रूझ यांनी अनेक नेतृत्वाची पदे भूषवली आहेत आणि ते विविध व्यावसायिक संस्थांच्या मंडळावर आहेत. ते जिनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठित ‘युनियन इंटरनॅशनल फॉर कॅन्सर कंट्रोलचे’ अध्यक्ष, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी संचालक, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील हेड अँड नेक सर्व्हिसेसचे प्रमुख आणि प्रमुख संचालक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि ‘फाउंडेशन हेड अँड नेक ऑन्कोलॉजीचे’ माजी अध्यक्ष आणि ‘एशियन सोसायटी ऑफ हेड अँड नेक ऑन्कोलॉजीचे’ माजी अध्यक्ष होते.

डॉ. श्रीपाद बाणावली
कर्करोग रासायनिक वैद्यकीय उपचार तज्ञ
डॉ. बाणावली, एमडी (मेडि., मुंबई); बीसी (पेडियाट्रिक्स, यूएसए); बीई (हेम-ऑन्क, यूएसए) हे शैक्षणिक संचालक आणि वैद्यकीय आणि बाल्य-कर्करोग विभागाचे प्राध्यापक आहेत; टाटा स्मारक केंद्र, परळ, मुंबईचे ग्रामीण संपर्क (outreach) कार्यक्रमाचे समन्वयक आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत, ज्यात इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या पेड हेम-ऑन्क चॅप्टरचे अध्यक्षपदाचा समावेश आहे. ते टाटा स्मारक केंद्रातील बालरोग रुग्णांसाठी मोफत उपचार आयोजित करणाऱ्या इम्पॅक्ट सीटी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या वैद्यकीय आणि बालरुग्ण कर्करोग विभागाचे माजी प्रमुख होते. ते ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल (भारत)’ यांना सल्ला देणाऱ्या ‘ड्रग्ज अॅडव्हायझरी कमिटीचे’ सदस्य आहेत. बालपणीच्या कर्करोगातील मेट्रोनॉमिक्समधील संशोधनाच्या मान्यतेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय "बार्टन कामेन पुरस्कार" सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. मेरी ऍन मुकाडेन
कर्करोग विकिरण चिकित्सा तज्ञ आणि उपशामक उपचार तज्ञ
डॉ. मुकाडेन या कार्डिफ विद्यापीठ, युके येथे प्रशिक्षित, विकिरण चिकित्सा कर्करोगतज्ञ (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट) आहेत ज्यांनी उपशामक उपचार पद्धतीत देखील प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांनी टाटा स्मारक केंद्रामध्ये ‘पॅलिएटिव्ह मेडिसिन’ विभाग तसेच भारतातील ह्या विषयाचा पहिला, एमडी चा अभ्यासक्रम सुरू केला. त्यांना बालरोगशास्त्रात विशेष रस आहे आणि त्यांनी टाटा स्मारक केंद्रामध्ये पॅलिएटिव्ह मेडिसिनसाठी फेलोशिप आणि पेडियाट्रिक पॅलिएटिव्ह मेडिसिन सुरू केले. त्या ‘इंटरनॅशनल चिल्ड्रन्स पॅलिएटिव्ह केअर नेटवर्कच्या’ माजी अध्यक्षा आणि ‘इंडियन असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर’च्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांना कर्करोगाशिवाय इतर व्याधींमधील उपशामक उपचारांमध्ये देखील रस आहे. त्यांनी किंग जॉर्ज मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपशामक उपचारांसाठी ‘सुकून निलय’ ही रुग्णसेवा सुरू केली आहे. त्यांनी ट्रॉम्बे येथील ईएफएफ निरामय निकेतन येथे देखील बाह्य रुग्ण सेवा सुरू केली आहे आणि लवकरच मानसिक आरोग्य उपशामक सेवा सुविधा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

डॉ. रवी नायर
कन्सल्टंट ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट
डॉ. नायर [एमएस (पीजीआय), डीएनबीई, डी.एल.ओ (लंडन), एफआरसीएस (ग्लासगो), डी.सी.सी.एफ (पॅरिस)] हे ‘इंटर-इन्स्टिट्यूशनल बायोमेडिकल इनोव्हेशन प्रोग्राम सी-कॅम्प’चे कार्यकारी संचालक, ‘साक्रा प्रीमियम’, बंगळुरू येथे कन्सल्टंट ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट, ‘डिझीईझी रेफरल क्लिनिक’, बंगळुरू येथे कन्सल्टंट न्यूरोऑटोलॉजिस्ट आहेत. ते ‘सायक्लॉप्स मेडिटेक प्रायव्हेट लिमिटेड’चे सह-संस्थापक आणि शैक्षणिक सल्लागार आहेत आणि श्री देवराज उर्स मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रॅक्टिस (यूजीसी) चे प्राध्यापक आणि सर्जिकल अँड अलाइड बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य, श्री सिद्धार्थ युनिव्हर्सिटी, तुमकुर, तसेच आदिचुंचनगिरी युनिव्हर्सिटीच्या संशोधन सल्लागार मंडळाचे सदस्य, आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग एनआयटी, राउरकेला, ओडिशा येथे मार्गदर्शक म्हणून काम करतात. बंगळुरूमधील एचसीजी अकादमिकचे माजी डीन आणि ईएनटी, सेंट जॉन्स नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस, बंगळुरूचे विभाग प्रमुख, डॉ. नायर, हे बंगळुरूच्या ईएनटी सर्जन असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील आहेत.

डॉ. (शल्य विशारद लेफ्टनंट कमांडर, निवृत्त) अनुश्री वर्तक
कर्करोग शल्य चिकित्सा तज्ज्ञ
डॉ. वर्तक यशोदा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, गाझियाबाद येथे ‘ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजी’ विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. युरोपियन सर्जिकल सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजीने आयोजित केलेल्या फ्रान्समधील ‘ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी’वरील प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, त्यांना २०१८ मध्ये भारतीय सशस्त्र दलात नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांनी ५ वर्षे सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून सुरुवातीला INHS अश्विनी, मुंबई आणि नंतर AHRR, दिल्ली येथे काम केले. त्यांनी ‘इंटरनॅशनल स्कूल ऑफ ऑन्कोप्लास्टिक सर्जरी’मधून ‘ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरी’मध्ये फेलोशिप आणि रोम विद्यापीठातून ‘ऑन्कोप्लास्टिक ऑब्झर्व्हरशिप’ पूर्ण केली आहे. डॉ. वर्तक यांना कर्करोग जागरूकता आणि महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्याबद्दलच्या कार्यात विशेष रस आहे. स्तनाच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढविण्यासाठी राबवलेल्या सोशल मीडिया मोहिमेसाठी ‘बीइंगब्रेस्टअवेअर’साठी लेखन आणि इंडियन कॅन्सर सोसायटीसाठी स्वयंसेवक कर्करोगतज्ञ आहेत. त्यात डॉ वर्तक ‘RiseAgainstCancer’ ह्या ‘मोबाइल ऍप’ साठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यात योगदान देतात.

डॉ. प्रिन्स जॉन
उपशामक सेवा आणि वृद्धापकालीन सेवा तज्ञ फिजिशियन
डॉ. प्रिन्स जॉन हे एक अनुभवी प्रशामक सेवा आणि वृद्धापकालीन सेवा तज्ञ असून त्यांनी त्यांच्या कामात १५ वर्षांहून अधिक काळ समर्पित व्यावसायिक सराव केला आहे. त्यांचे पायाभूत वैद्यकीय शिक्षण मुंबईत पूर्ण झाले, त्यानंतर त्यांनी युनायटेड किंग्डममधील कार्डिफ विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले. पुण्यात स्थलांतरित होण्यापूर्वी, डॉ. जॉन यांनी टाटा स्मारक रुग्णालय आणि मुंबईतील इतर प्रमुख खाजगी सेवा सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. त्यांचे वैद्यकीय कौशल्यात प्रगत कर्करोग तसेच प्रगतीशील इतर रोगांच्या व्यापक व्यवस्थापनाचा समावेश आहे. डॉ. जॉन यांना कर्करोगाशी संबंधित वेदनांचे शमन आणि श्वसन, न्यूरोलॉजिकल आणि नेफ्रोलॉजिकल स्थिती असलेल्या रुग्णांसाठी विशेष उपशामक नियोजन करण्यात विशेष कौशल्य आहे. त्यांची व्यावसायिक वचनबद्धता, अपवादात्मक काळजी प्रदान करण्यावर केंद्रित आहे, जिचे प्राथमिक उद्दिष्ट सर्व रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे आणि त्यांच्या आजारांच्या गुंतागुंतीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे हे आहे.
कायदेविषयक सल्लागार

अॅड. डॉ. निलिमा भडभडे
शिक्षणतज्ज्ञ आणि वकील
डॉ. भडभडे या एक शिक्षणतज्ज्ञ आणि अधिवक्ता म्हणून ओळखल्या जातात. या अद्वितीय कौशल्यामुळे त्या करार, मालमत्ता, विमा आणि पुरावे यासारखे कायदे शिकवताना व्यावहारिक पैलू लागू करण्यास आणि कायदेशीर कामासाठी संशोधन-आधारित दृष्टिकोन स्वीकारण्यास सक्षम आहेत. त्या करार आणि करार कायद्यावर कार्यशाळा आणि वकिली कौशल्ये, कायदेशीर लेखन आणि निर्णय लेखन यावर प्रशिक्षण सत्रे आयोजित करतात. त्यांनी ‘आयएलएस लॉ कॉलेजम’धील १००+ संघांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पाठवले आहे. विशिष्ट मदत (सुधारणा) कायदा २०१८ मध्ये संसदेने स्वीकारलेल्या कायद्यात मूलभूत बदलांची शिफारस करणाऱ्या तज्ञ समितीच्या त्या सदस्य होत्या. त्या पुस्तके, लेख, कायदेशीर मते आणि याचिका लिहितात. तेरा वर्षे वकील म्हणून काम केल्यानंतर, त्यांनी ‘आयएलएस’मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केले व २०१६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. डॉ. भडभडे कायद्याच्या पदवीधरांना वकिली कौशल्यांवर आणि औद्योगिक कामगारांना करार आणि पुराव्यावर प्रशिक्षण देत आहेत. त्यांची https://obiterdicta.in वेबसाइट, कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत कायदेशीर माहिती आणि मृत्युपत्रांची माहिती प्रदान करते.

अॅड. श्रीसिद्धी साबणे
विदा गोपनीयता तज्ज्ञ
अॅड. साबणे (सीएस, एलएलएम) ही एक सिव्हिल आणि कॉर्पोरेट वकील आहेत. त्या डेटा प्रायव्हसी, सायबर कायदा आणि सायबर सिक्युरिटीमध्ये विशेषज्ञ आहेत. त्या ‘जीडीपीआर’ अनुपालन, ‘एआय’ कायदा आणि धोरण आणि सायबर गुन्हे निवारण यावर कायदेशीर मार्गदर्शन देतात. त्यांच्या कौशल्यात, संघटनांना डेटा संरक्षण धोरणांवर सल्ला देणे, मजबूत डेटा गोपनीयता धोरणे विकसित करणे आणि जीडीपीआर सारख्या आंतरराष्ट्रीय डेटा कायद्यांशी आणि भारताच्या उदयोन्मुख डेटा गोपनीयता व्यवस्थेशी व्यवसाय पद्धतींचे संरेखन करणे समाविष्ट आहे. विविध क्षेत्रातील क्लायंटसाठी, व्यावसायिक विवादांच्या विस्तृत श्रेणीचे व्यवस्थापन करण्यात देखील त्यांचे योगदान आहे तसेच कौटुंबिक कायद्याचा देखील त्यांचा अभ्यास आहे. जटिल कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी एक धोरणात्मक आणि समाधान-केंद्रित दृष्टिकोन आणण्यात त्या निपुण आहेत.
तंत्रज्ञान सल्लागार

आशिष यार्दी
‘ईआरपी’ सल्लागार (उद्योग संसाधन नियोजन)
आशिष यार्दी हे एक ईआरपी सल्लागार आणि वेरार्ट सिस्टम्सचे संस्थापक-संचालक आहेत. ते सध्या वेरार्ट चे एम.डी. आहेत. त्यांच्या सखोल औद्योगिक ज्ञानामुळे ते विविध व्यवसाय प्रक्रियांबाबत एक अग्रेसर तज्ञ आहेत. त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली भारतातील आणि परदेशातील ग्राहकांनी ज्याची ग्वाही दिली आहे अशा OpScale - ईआरपी सॉफ्टवेअर ह्या संस्थेची उभारणी झाली आहे.

नकुल दातार
सॉफ्टवेअर सोल्युशन्स तज्ञ
नकुल दातार (युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून सीई, सीएस या विषयांत बीएस आणि एमएस) हे ‘व्हिया सिम्प्लेक्स’, यूएसए चे संस्थापक आणि ‘ड्रोनोग्राफिक इंक.’, यूएसए चे संस्थापक-भागीदार आहेत. ते क्रिक्सी प्रायव्हेट लिमिटेडचे मोबाइल डेव्हलपमेंटचे माजी संचालक आणि व्हर्नाक लँग्वेज टेक्नॉलॉजीजचे माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी होते. त्यांना अनेक देशआणि डोमेन्स मध्ये सॉफ्टवेअर उत्पादनाचा आणि विकासाचा विस्तृत अनुभव आहे आणि भू-स्थानिक (geo-spatial) बुद्धिमत्ता, गतिशीलता, मशीन-लर्निंग आणि मानवी-संगणक परस्परसंवाद सुलभ करण्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव आहे.