कर्करोगाविषयी जागरूकता ही पहिली पायरी आहे जी जाणीवपूर्वक केलेल्या कृतींसह (योग्य आहार, व्यायाम, जीवनशैली आणि स्क्रीनिंग चाचण्यांद्वारे) कर्करोग प्रतिबंध साध्य करण्यास मदत करू शकते.
कोणत्या जन्मजात गोष्टी (लिंग आणि अनुवांशिकता), तुमचे वय, आधीपासून अस्तित्वात असलेले आजार, तुमच्या सवयी आणि तुमचे वातावरण हे सर्व एकमेकांशी कसे संबंधित असतात, आणि या सर्वांच्या एकत्रित परिपाकाने अनेक कर्करोगांचा धोका वाढविण्यास कसा हातभार लावला जातो हे समजून घेणे म्हणजे कर्करोगाबद्दल जागरूकता.
आहार
एकंदरीत, कमी चरबीयुक्त, जास्त फायबरयुक्त आहार कर्करोगाचा धोका कमी करतो असे दिसून आले आहे. प्रामुख्याने वनस्पती-आधारित आहाराचे पालन केल्याने तुम्हाला भरपूर फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतील. वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने आतड्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. निरोगी आहार हा संपृक्त मेदरहित प्रथिने, फळे, भाज्या आणि धान्यांवर आधारित असावा.
व्यायाम
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की लठ्ठपणा लवकरच कर्करोगाचे सर्वात मोठे प्रतिबंधक कारण बनेल. नियमित व्यायामामुळे चरबी कमी होण्यास आणि निरोगी वजन राखण्यास मदत होऊन कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. त्यासाठीचे महत्त्वाचे टप्पे म्हणजे दररोज किमान ३० मिनिटे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि निरोगी वजन राखणे, आणि भारतीयांनी १८-२४ बीएमआय राखणे.
जीवनशैलीत बदल
कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक दूर करण्यासाठी जीवनशैलीत बदल केल्याने कर्करोगाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होते असे दिसून आले आहे. अशा जोखीम कमी करण्याच्या जीवनशैलीत तंबाखूपासून दूर राहणे, अतिरेकी मद्यपान न करणे, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, आयनीकारक किरणोत्सर्गाचा संपर्क कमी करणे इत्यादिंचा समावेश आहे.
प्राची होप फाउंडेशन जनसामान्यांसाठी योग्य कर्करोग प्रतिबंधक आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्करोग प्रतिबंधक केंद्रे स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. Please contact PRACHI for further information and participation.
